वेदवाङ्मय भारताला ललामभूत असे साहित्य हे वाङ्मय अतिप्राचीन आणि अपौरुषेय मानतात. चार वेदांपैकी दुसरा यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद ही त्याचीच एक उपशाखा. ह्यात बालऋषि नचिकेता हे प्रकरण आहे. वेद समजणे सोपे जावे म्हणून लिहिली गेली ती उपनिषदे. त्यातील एक कठोपनिष्द.नचिकेताला यमराजाने जे ज्ञान दिले व जे वर दिले, त्यांचे वर्णन या वेदांगात केले आहे. पवित्र कठोपनिषदाचे रोज पठण करणे, ते कंठस्थ करणे ही प्रथा आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक विद्वानांनी या उपनिषदावर ग्रंथ लिहिले आहेत. कित्येक भाषांमधून त्याचे भाषांतर झाले आहे. अशा या तेजस्वी बालकाची कथा म्हणजेच बाल नचिकेता.