भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत बसवेश्वरांचे हे लघु चरित्र आणि विचार अनेक आधुनिक विचारवंतांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या अंधकारातून खऱ्याखुऱ्या धर्माच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा मार्ग अनुसरला पाहिजे. त्यासाठी ऐकुया संत बसवेश्वर.