भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. 'रामायण' या महाकाव्यातून महर्षी वाल्मीकींनी प्रभू श्रीराम आणि सीता यांचे उदात्त जीवन आणि कार्य यांचे चित्रण केले आहे. रामायण हे महाकाव्य जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत या जगात वाचले, सांगितले जाणार आहे. त्याचे रचनाकार महर्षी वाल्मीकींचे हे लघुचरीत्र श्रोत्यांना त्यांच्या लेखनाची कथा सांगेल.
काल्पनिक कहानियां और साहित्य