संपूर्ण ग्रहमालिकेत, जीवसृष्टीला पोषक ठरली ती आपली पृथ्वी ! आपण इथल्या ऊन - थंडी - वाऱ्याबद्दल कुरकुर करत असलो आणि आपल्याला काय मिळालं आहे याची आपण किंमत ठेवली नाही तरी सगळेच आपल्यासारखे नसतात . आपल्यापेक्षा वेगळ्या सजीवांना पृथ्वीची आपल्यापेक्षा जास्त कदर आणि गरज असेलही ! अशा आपल्याहून समर्थ सजीवांनी या पृथ्वीचे जतन एक अभयारण्य म्हणून केलं असेल तर? डॉ.जयंत नारळीकर या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञ लेखकाची ही खिळवून ठेवणारी विज्ञान कादंबरी नक्की ऐका!
Science fiction och fantasy